लातूर येथील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

लातूर येथील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल



 


लातूर : प्रतिनिधि


18 जुलै 2020 


 


जगभरात आरोग्यविषयक आणीबाणी चालु आहे व कधी नव्हे एवढे प्रचंड महत्व आज डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील लोकाना आले आहे. पण अशा वातावरणातही काही महाभाग डॉक्टरकीच्या नावाखाली आपली दुकानदारी साधुन घेत आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, लातूर शहरातील महादेव नगर ,खंडापुर रोड येथे सुभाष ढोणे नावाचा व्यक्ती डॉक्टर असल्याची बतावणी करून आरती क्लिनिक


नावाने दवाखाना चालवित होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर उपविभागीय पोलिस आधिकार्यांच्या सांगण्यावरून तालुका आरोग्य आधिकारी डॉ अशोक सारडा यांनी ढोणे यांच्या क्लिनिकला भेट दिली त्यांच्या डॉक्टर असल्याची शहानिशा करण्यासाठी म्हणुन त्यानी वैद्यकीय पदवी प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांच्याकडे नैचरोपैथीची पदवी असल्याचे दिसुन आले. मात्र तोतया डॉक्टर ढोणे यांची ऐलोपैथीची प्रैक्टिस सुरू असल्याचे दिसुन येत होते. या अनुषंगानी आरोग्य आधिकारी डॉ सारडा यानी भारतीय कौसिंल मेडिकल ऐक्ट व महाराष्ट्र मेडिकल प्रैक्टीशनल एक्ट अन्वयेही प्रमाणपत्राची मागणी केली असता ढोणे यानी ते ही उपलब्ध करून दिले नाही. यावरून ढोणे हे बोगस डॉक्टर असल्याचे उघड होताच त्यांच्या विरोधात कलम 15 (2) भारतीय मेडिकल काउंसिस ऐक्ट 1956 कलम 33 (2) , महाराष्ट्र मेडिकल प्रैक्टीशनर एक्ट 1961तसेच भादंवि कलम 175 , 169, 419,420, 471 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.