बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर MIM चे तहसीलदाराना निवेदन : प्रतिकात्मक कुरबानीचा उल्लेख मागे घेण्याची केली मागणी

बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर MIM तर्फे तहसीलदारांना निवेदन : प्रतिकात्मक कुरबानीचा उल्लेख मागे घेण्याची मागणी 



औसा - प्रतिनिधी 


28 जुलै 2020


( अल्ताफ सय्यद ) 


मुस्लीम धर्मातील एक मोठा सण ईद -ऊल-अजहा म्हणजेच बकरी ईद हा जवळ येतो आहे. पण रमजान ईद प्रमाणेच आज बकरी ईदलाही कोरोना संकटाचे ग्रहण लागले आहे. तेव्हा सोशल डिस्टसिंग व प्रतीकात्मक कुरबानी अश्या गोष्टींमुळे हा मुद्दा बराच चर्चेत आला आहे. या पार्श्वभुमीवरच एम आय एम पक्षाच्या वतीने औसा तहसील कार्यालयामार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आदेशामध्ये केलेला प्रतिकात्मक कुरबानीचा उल्लेख त्वरित काढण्यात यावा, ईदच्या अनुषंगाने ईदगाह मैदानावर किंवा प्रत्येक मस्जीदीमध्ये किमान 50 मुस्लिम समाज बांधवांना नमाज पठण करण्याची अनुमती देण्यात यावी, कुरबानी साठीची खरेदी करण्यासाठी बाजारही खुला करावा दरम्यान महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या सुरक्षेच्या सुचना व फीजिकल डीस्टेन्सिंगचे काटेकोर पालन मुस्लिम समाजबांधवांकडु होईल . मात्र वरील मागण्या मान्य व्हाव्यात. अश्या आशयाचे निवेदन एम आय एम पक्षाचे माजी लातुर जिल्हा उपाध्यक्ष अँड. गफुरुल्लाह हाशमी , एम आय एम प्रमुख अल्हाज सय्यद मुजफ्फर अली इनामदार , एम आय एम औसा शहर प्रसिद्धी प्रमुख अजहर कुरेशी ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..