नाशिक महापालिकेने समुपदेशक पदासाठी MSW च्या विद्यार्थांनाच प्राधान्य द्यावे: समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाची मागणी

नाशिक महापालिकेने समुपदेशक पदासाठी MSW च्या विद्यार्थांनाच प्राधान्य द्यावे: समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाची मागणी



 


मुंबई - प्रतिनिधी


दि. 26 जुलै 


देशभरामधील अनेक विद्यापीठात समाजकार्य विषयात वेगळी पदवी प्रदान केली जाते. हा पदवी अभ्यासक्रम BSW/ Msw म्हणुन ओळखला जातो. सामाजिक प्रश्नांबद्दल संवेदनशील असणारे अनेक तरूण तरूणी मोठ्या प्रमाणावर या अभ्यासक्रमाकडे वळतात अभ्यासक्रम पुर्ण झाल्यावर मात्र शासन व समाजाकडुन रोजगार वा विकासाच्या संधीच्या बदल्यात यांच्या माथी नेहमी उपेक्षाच येते. हेच विधान गडद करणारी एक मोठी घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की , कोविड -19 साथीशी लढण्यासाठी व रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी म्हणुन नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कंत्राटी पद्धतीने मानधन स्वरूपात सदुपदेशकाच्या जागेसाठी जाहिरात काढली आहे. मात्र या जागेसाठी अधिकृत शैक्षणिक पात्रता ही MSW/BSW असताना क्लिनिकल सायकॉलॉजीमधील BA किंवा MA ही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामुळे MSW व BSW पदवीधर उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.


या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असताना , " नाशिक महापालिकेचा MSW व BSW पदवीधारकांना पद्धतशीर डावलण्याचा हा डाव दिसतोय व संबंधित पदास पुरक असं आमच्या पदवीचं शिक्षण असताना इतर पदवीधरांना प्राधान्य दिलं चाललय हे पुर्णतः चुकीचं आहे. महापालिकेने समाजकार्य पदवीधराना सदुपदेश पदासाठी प्राधान्य द्यायला हवं." अशी प्रतिक्रिया समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड यानी महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली.