युवक क्रांती दल व आम आदमी पार्टी तर्फे मुख्यमंत्र्यांना डिजीटल निवेदन -: दुधाचा भाव वाढवुन देण्याची केली मागणी .

युवक क्रांती दल व आम आदमी पार्टी तर्फे मुख्यमंत्र्यांना डिजीटल निवेदन, दुधाचा भाव वाढवुन देण्याची केली मागणी .



 


महाराष्ट्र जीवन - प्रतिनिधी-


27जुलै 2020


( माउली घोलप )


 लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रे मोठ्या प्रमाणात संकटात सापडले असुन यातुन दुधउत्पादक शेतकरीही सुटलेला नाही. आज दुध उत्पादन करणार्या शेतकर्यांच्या वतीने युवक क्रांती दल व आम आदमी पार्टी ( AYW ) च्या तर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इ-मेल पाठवुन निवेदन देण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून लॉक डाऊन चे कारण देत दुधाची खरेदी दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशी परिस्थिती असताना शासनाने काल पासून अतिरिक्त दुधाची खरेदी बंद केली आहे. दुधउत्पादक शेतकर्यांच्यासाठी ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे दुधाचे खरेदी दर आधीच पडले असताना या निर्णयामुळे ते अजुन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकर्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तेव्हा या अनुषंगानी शेतकऱ्याच्या दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर खरेदी दर मिळावा., केंद्र सरकारने बाहेरच्या देशातून दुधाची पावडर आयात करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो तातडीने रद्द करावा.यासाठी प्रयत्न करावेत. , तसेच राज्य सरकारने 10 लाख लिटर ऐवजी 40 लाख लिटर दुधाची खरेदी करावी.,दुधाचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे.इ मागण्या करण्यात आल्या या मागण्या मान्य न झाल्यास समस्त गरीब, शोषित , दुधउत्पादक शेतकरी व आम आदमी पार्टी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना हे डिजीटल निवेदन पाठवण्याच्या उपक्रमामध्ये युक्रांदचे लिंबराज बिराजदार, आदिनाथ जाधव , निलेश सुर्यवंशी तर आपचे प्रवक्ते विक्रांत शंके, सुमित दिक्षित, शाम माने, अमित पांडे, सुमित  पन्हाळे , पुजा कांबळे, इश्वर काळे, श्रुती निकम ,महादेव सरवदे यासह  अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता.