चिंचोडी गावातील वाळुतस्करीकडे प्रशासनाची डोळेझाक : प्रशासन वाळू माफियांचा दलाल बनले आहे का? ग्रामस्थांचा सवाल
निलंगा - प्रतिनिधी
जुलै 16 -2020
लातूर जिल्ह्यातील चिचोंडी गावात वाळुमाफियांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळात झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,गेल्या अनेक दिवसापासुन चिंचोडी गावातील मांजरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. या वाळूचा उपसा करताना होणार्या वाहनांच्या ये जा मुळे (ट्रॅक्टर ,टिप्पर ,जेसीबी) गावालगतचे'पानंद रस्ते' पुर्णपणे खराब झाले आहेत. यामुळेग्रामस्थांना शेतात ये जाकरण्यासाठी खूप त्रास होत आहे. ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार व तलाठी इ ना तोंडी तक्रार केली असता याचा वाळुमाफियांवर काही एक परिणाम होत नाहीये. आणि जर कार्यवाही झालीच तर आधिकार्यांशी संगनमत असणारे वाळुमाफिया लगेच कार्यवाहीमुक्त होतात व त्यांच्याकडे वाळुउपस्याचा परवाना असल्याचे उत्तर गावकर्यांना मिळते. या पार्श्वभुमीवर कुठल्याही प्रकारे स्थानिक ग्रामस्थांचा निभाव या वाळुमाफिया व मुजोर प्रशासनासमोर लागत नाहीये. वाळुचे परवाने व वाळुतस्करीबद्दल महसुल प्रशासनाला माहिती मागितली असता वा तक्रार केली असता तलाठ्याने तहसीलदारकडे बोट दाखवणे व तहसीलदारने तलाठ्याकडे असे प्रकार सुरू झाले आहेत. शिवाय वाळुवाहतुक करणार्या वाहनाच्या ये जा मुळे खराब झालेले गावरस्ते तुम्ही ठीक करून देणार का ?? असा प्रतिसवालही ग्रामस्थांनी प्रशासनाला केला आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे वाळुमाफियानी गावात ठिकठिकाणी साठवलेली वाळु उचलुन नेणे चालु आहे मात्र चिंचोडी गावाला वाळुमाफियापासुन मुक्ती हवी आहे. आणि त्यांचे दलाल बनलेले प्रशासन हे करू शकेल का अशी प्रतिक्रिया चिंचोडी ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली..