राज्य

राजगृहावर भ्याड हल्ला करून या राष्ट्रीय वास्तूचा अवमान करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याची आम आदमी पार्टीची मागणी .



 


मुंबई -प्रतिनिधी 


8 जुलै 2018 


 


काल डॉ बाबासाहेबांचे घर व संविधानप्रेमी पुरोगामी जनतेचे अस्मितास्थान असणारे दादर येथील वास्तुस्मारक राजगृहावर काही अद्यात माथेफिरूनी भ्याड हल्ला केला.या पार्श्वभुमीवर आम आदमी पार्टी ( महा )संबंधितावर कडक कार्यवाही व्हावी व पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.  


आदरणीय डॉ. बाबासाहेबांचे घर, दादरचे राजगृह हे राष्ट्रीय स्मारक असून, हा एक असा सांस्कृतिक वारसा आहे कि ज्याचे मोल पैशात होऊ शकत नाही. घटनाकार डॉ. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे नेहमीच भारतीय समाजाला प्रेरणा देत राहणारे आहे. राजगृहामधील तोडफोड म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेल्या देशाच्या संविधानावर केलेला हल्ला आहे. ही तोडफोड निषेधार्ह आहे असे मत आपचे राज्य सचिव, श्री. धनंजय शिंदे ह्यांनी व्यक्त केले. तर राजगृह म्हणजे, सर्वसामान्यातून पुढे आलेल्या डॉ बाबासाहेबांच्या अत्युच्च राष्ट्रीय नेतृत्वाच्या आठवणींचे प्रतीक आहे.


ह्या निषेधार्ह घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाईची करावी व भविष्यात अश्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याच्या उपायोजना करण्यात याव्या अशी मागणी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी सदस्य श्रीमती प्रीती शर्मा मेनन ह्यांनी केली असुन यापुढेही या मागण्या मान्य होईपर्यंत पक्ष सातत्याने याचा पाठपुरावा करत राहील असे पक्षपदाधिकार्यानी महाराष्ट्र जीवनशी बोलताना सांगितले.