संपादकीय

राजगृहावरचा हल्ला अनपेक्षित की पुर्वनियोजित ??



 


काल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील निवासस्थान 'राजगृहावर ' अद्यात व्यक्तीकडुन भ्याड हल्ला झाला. खिडक्यांच्या फुटलेल्या काचा , फुटलेल्या कुंड्या इ ची छायाचित्रे समोर आली व वCCTV कैमेर्याची तोडफोड झाल्याचे वृत समजले. या निंदनीय घटनेचे पडसाद अतिशय तीव्रतेने देशभर उमटले. आता तिघाडी सरकार खडबडुन जागे झाले आहे. मुख्यमंत्री , गृहमंत्र्यापासुन ते स्थानिक पोलिस आधिकार्यापर्यंत ते संबंधित माथेफिरूला पकडण्याचे त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन देत आहेत. पुढे कार्यवाही होत राहील. प्रशासन तपास करेल आरोपी सापडतील कदाचित किंवा दाभोळकर , पानसरे प्रकरणाची पुनरावृतीही होईल. आता राजगृहावरच्या भ्याड हल्ल्याने संतप्त आंबेडकरी जनता, सरकारचं आश्वासन व मा बाळासाहेबांच शांततेच आवाहन या पार्श्वभुमीवर एक प्रश्न उरतो तो म्हणजे राजगृहावरचा हल्ला खरच अनपेक्षित आहे की पुर्वनियोजित .


याच्या शक्यता शोधायच्या असतील तर आपणांस दोन्ही बाजुचा संयमानी आणि तटस्थेने विचार करायला हवा. प्रथम आपण सर्वात जवळची शक्यता गृहीत धरून चाललं पाहिजे. ती म्हणजे राजगृहावरचा हा हल्ला पक्का पुर्वनियोजित , मनुवादी व जातीय मानसिकतेतुन व वैचारिकतेपेक्षा वैयक्तिक द्वेषातुन केला गेलेला आहे. कारण देशभरामध्ये मनुवादी ताकती झपाट्याने वाढत आहेत. त्यात मा प्रकाश आंबेडकर हे सातत्याने जातीयवादी व मनुवादी लोकांच्या रडारवर असतात. आज देशाची व पर्यायाने महाराष्ट्र राज्याची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती पाहिली तर वास्तव डोळ्यांना झळा पोचविणारं आहे. एकीकडे सातत्याने होणारा भगव्या कट्टर हिंदुत्ववादाचा जयघोष, कुठल्याही समाजातील आऱ़क्षणाला कडाडुन होणारा विरोध , दलित मुस्लिम समुदायांवर लादले जाणारे छळ, अनन्वित अत्याचार व या सगळ्याच्या विरोधात हातात संविधान धरून उभी राहणारी आंदोलन, आंबेडकरी,संविधानप्रेमी कार्यकर्त्याची मुजोर सत्ताधीशांकडुन केली जाणारी मुस्कटदाबी . मग ते आनंद तेलतुंबडेना जेलमध्ये टाकणं असो की देशभर NRC/CAA विरोधात निदर्शने करणार्यावर देशद्रोहाचे गुन्हे लादणे असो. तेव्हा या पार्श्वभुमीवर देशामध्ये आंबेडकरवादी विरूद्ध मनुवादी अशी सरळ सरळ उभी मांडणी झालेली दिसुन येते. मात्र असे भ्याड हल्ले तेव्हा होतात जेव्हा विचारांची लढाई विचाराने खेळली जात नाही. वैचारिक द्वेष हा वैयक्तिक द्वेष बनुन त्यांच्या नापाक इराद्यासकट जमीनीवर उतरतो. याची दुसरी बाजु काही प्रसारमाध्यम अशी मांडत आहेत की , राजगृहावर हल्ला करणारा व्यक्ती मनोरूग्ण असल्याचं बोललं जातं आहे. आता पाठीमागचं सत्य शोधायचं म्हटल तर हा दावा प्रथमदर्शनीच हास्यापद, पोकळ व बचावात्मक वाटतो. ते काही असो. समस्त मानवतावादी, संविधानप्रेमी, पुरोगामी जनतेचे श्रद्धास्थान असणारे राजगृह. आज अशा वास्तुवर भ्याड हल्ला होतो ही बाब अतिशय निंदनीय व पुरोगामी, सुसंस्कृत म्हणवुन घेणार्या महाराष्ट्राच्या तोंडाला खसा खसा काळ पुसणारी आहे. या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोत.पण यानिमित्ताने प्रतिगामी शक्तींना आम्हांला अतिशय ठणकावुन हे सांगावसं वाटतय


" Hey you ! Always Remember Dead Ambedkar is more Dangerous than alive Ambedkar " असे भ्याड हल्ले करून हे औकातच दाखवत आहेत. आणि इतिहास साक्षी आहे , प्रतिगामी शक्ती कधीच यशस्वी झालेल्या नाहीत. आता बाबासाहेबांचे वैचारिक वारस म्हणुन तुमची माझी ही नैतिक जबाबदारी आहे की , आपण पुर्वीपेक्षा बाबासाहेबांच्या विचारास आधिक बांधिल होवुया. व असे अनेक भ्याड हल्ले परतवुन लावुया. हे ही तितकच खर आहे की इतिहास याना कधीच माफ करणार नाही.


            - विक्रांत शंके


( लेखक हे महाराष्ट्र जीवन लाईव्ह समुहात कार्यकारी संपादक म्हणुन कार्यरत आहेत)


 


( Above content is secured by copyright law )