डॉ काफिल खान यांच्या वरिल खोटे गुन्हे मागे घ्या : पुरोगामी संघटनांची मागणी . 

डॉ काफिल खान यांच्या वरिल खोटे गुन्हे मागे घ्या : पुरोगामी संघटनांची मागणी . 



 माजलगाव - प्रतिनिधी


दि .25 जुलै 20


 


NRC,CAA,NPR च्या विरोधत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे व त्यांना तातडीने सोडण्यात यावे म्हणून आज माजलगाव येथिल उपजिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आपल्या प्रजातंत्र देशांमध्ये सरकार विविध निर्णयांच्या विरोधात आंदोलन करणे हा आपला संविधानीक अधिकार आहे.या आधिकारा द्वारे संपूर्ण देशात NRC,CAA,NPR यांचं विरोध आंदोलन चालू होते . लॉकडाऊन मध्ये NRC,CAA,NPR यांचं विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याना अटक केलं जातंय. NRC,CAA,NPR यांचं विरोधात आंदोलन करणारे डॉ काफिल खान यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. डॉ काफिल खान यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता भरपूर लोकांचे प्राण वाचवले आहेत उत्तर प्रदेश मध्य एक छोट्या मुलींचे त्यांनी प्राण वाचवले पण उत्तर प्रदेश सरकारच्या लापरवा धोरणामुळे त्या मुलीचा प्राण गेला या मुलीचा प्राण गेल्याच्या खोट्या केस आंतर्गत त्या अटक करण्यात आली आहे तरी त्यांच्या वरिल सर्व खोटे गुन्हे मागे घ्यावे व त्यांना तातडीने सोडण्यात यावे तसेच विविध विद्यापीठांमधील मुस्लिम युवकांवर सुध्दा खोट्या गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे तरी त्यांच्यावरील खोटे गुन्हे वापस घ्या व त्यांना तातडीने सोडण्यात यावे .अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांना माजलगाव येथे देणात आले. उपस्थित मध्ये जमाते इस्लामी हिंदचे इफत्तेखार जकी बाबा ओबीसी संघटना चे केशव भारती, पुरुषोत्तम काटुळे भ्रष्ट्राचार निर्मुलन समिती चे विष्णु झोंबाडे MPJ चे शेख शौकत,इम्रान बेग, मैलाना आब्दुल कलाम मंचचे नविद सिध्दीकी आर पी आय चे ससाणे साहेब बहुजन क्रांती मोर्चाचे रमेश जाधव,अनिल साळवे नवनाथ कांबळे, लिंबाजी सोनपसारे, रतन लांडगे, रमेश घायळ, नितीन सोनवणे उपस्थित होते.