मृत व्यक्तीच्या नावावर केली 7 /12 ची नोंद , रेणापुर तहसीलदारांचा अजब कारभार : सामाजिक संघटनांकडुन तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी. 

मृत व्यक्तीच्या नावावर केली 7 /12 ची नोंद , रेणापुर तहसीलदारांचा अजब कारभार : सामाजिक संघटनांकडुन तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी. 



 


रेणापुर - प्रतिनिधी 


3 ऑगस्ट 2020 


( नवनाथ कोरे )


तुम्हांला आठवतय का ? मागे मकरंद अनासपुरेनी भुमिका केलेला एक मराठी चित्रपट आला होता. त्यात विहीर चोरीला गेल्याचा दावा शेतकरी मकरंद त्यात करतो. हा सिनेमा असला तरी तसा खरा प्रकार आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाफीलपणामुळे व भोंगळ कारभारामुळे घडलाय. फरक एवढाच की यात विहीर चोरीला गेलेली नाहीये तर चक्क मृताच्या नावावर सातबाराची नोंद झालीय. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेणापूर तालुक्यातील सिंधगाव या गावातील शेतकरी बशीर शेरीफोद्दीन शेख ( वय -७०) यांच्या नावे मालकी हक्काची ७/१२ नोंद असलेली गट न २४७/१ मधील १ हेक्टर ६१ आर शेतजमीन आहे. ही जमीन फसवणूक करून


हडपण्याच्या उद्देशाने इस्माईल तय्यबसाब शेख ( मृत व्यक्ती ) यांना समोर दाखवून काहीजणांनी दि. 29 /5/2020 रोजी खोट्या व बनावट ,बोगस संमती पत्राद्वारे बशीर शेरीफोद्दीन शेख यांच्या मालकी हक्काची 7/12 नोंद असलेली गट न 247/1 मधील 1.61R पैकी 0.36 R जमीन इस्माईल तय्यबसाब शेख ( मृत व्यक्ती ) यांच्या नावावर करणेबाबत हरकत नसल्याचा मजकूर असलेले संमतीपत्र दि. 29 /5/2020 रोजी बनवले गेले . आता हे संमती पत्र बोगस व बनावट तर आहेच मात्र यासाठी मुद्रांकसुद्धा २०18 वापरला गेला आहे. आता या संमती पत्राची कसलीही कल्पना शेतकरी बशीर शेरीफोद्दीन शेख याना नसून त्या संमती पत्रावरील बशीर शेख यांची स्वाक्षरी खोटी आहे. या बोगस व बेकायदेशीर संमतीपत्राच्या आधारे इस्माईल तय्यबसाब शेख यांच्या नावाने दि. 1/जुन/2020 रोजी मा. तहसीलदार , रेणापूर यांच्याकडे अर्ज करून एकत्रीकरणाच्या कमी झालेले क्षेत्र दुरुस्त करून मिळणेबाबत ची मागणी करण्यात आली. त्यांनतर तहसीलदारच्या आदेशाने दि.2/जुलै /2020 ते 3 /जुलै 2020 च्या दरम्यान बशीर शेरीफोद्दीन शेख यांच्या मालकी हक्काची ७/१२ नोंद असलेली गट न २४७/१ मधील १ हेक्टर ६१ आर पैकी ०. ३६ आर जमीन इस्माईल तय्यबसाब शेख या मृत व्यक्ती व्यक्तीच्या नावावर करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे तालुका परिसरात मोठा गहजब उडाला आहे. या संदर्भात अपना वतन संघटनेच्या माध्यमातुन हे प्रकरण समजल्यांनंतर पीडित शेतकर्याच्या वतीने या घटनेची तातडीने दखल घेत मृत व्यक्तीच्या नावावरील ७/१२ नोंदणी तात्काळ रद्द करून पूर्ववत बशीर शेख यांच्या नावावर करावी.


या प्रकरणात बोगस संमती पत्र बनवणाऱ्या व त्या बोगस


संमतीपत्राच्या आधारे मृत


व्यक्तीच्या नावावर ७/१२ नोंद करणाऱ्या तहसीलदार रेणापूर ,तलाठी सिंधगाव व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करून त्यांचेवर गुन्हे दाखल करावेत.संपूर्ण प्रकरणात मानसिक धक्का बसून रुग्णालयात उपचार बशीर शेख या शेतकरी कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी


शी मागणी संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे केली आहे. " प्रशासनाच्या अश्या गलथान कारभारामुळे एका माणसाला जरी संकटाला सामोरं जावं लागणार असेल तर समाजाची ही जबाबदारी आहे की , त्यांनी प्रशासनाच्या विरोधात आवाज बुलंद करायला हवा. शेख यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही " अशी प्रतिक्रिया अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली.