आम्ही नुस्तेच कोविड योद्घा - ना पगार ना PF, BHPL कंपनी व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचा भोंगळ कारभार
लातूर - प्रतिनिधी
4 Aug 2020
( विक्रांत शंके )
आज तुम्ही आम्ही सुरक्षित आणि निरोगी आहोत ते केवळ वैद्यकीय कर्मचार्यांमुळे. यामध्ये डॉक्टर नर्स,कंपांउंडर,वॉर्डबॉय,हाउस किपींग स्टाफचा सिंहाचा वाटा आहे. पण शब्दाने पोट भरत नाही हे सर्वांना माहिती आहे. एकीकडे कोविड योद्घा म्हणुन गौरवायचं व दुसरीकडे त्यांना उपाशी मारायचं असा प्रकार शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये समोर आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोविड संकटाच्या अनुषंगानी आरोग्यविषयक आणीबाणी लागु झाल्यानंतर लगेचच मार्चमध्ये कोविड रूग्णांच्या सेवेसाठी भागेश हॉस्पीटलिटी &प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने वॉर्डबॉय, हाउस किपींग साठी कामगारांची भरती करण्यात आली. रूग्णालयामध्ये साफ-सफाईपासुन ते कोविड रूग्णांची सेवा करण्यार्यापासुन ते मृतदेहाचा नेआण करण्यापर्यंत सगळ्या प्रकारची कामे हा कर्मचारी वर्ग करतो. मात्र या कर्माचार्यांच्या पगारी गेली 5 महिने झाले झालेल्या नाहीत. त्याचबरोबर यांना कोणत्याही प्रकारे नोकरीची सुरक्षितता किंवा इतर फायदे कंपनीने दिलेले नाहीत. मग त्यामध्ये इश्युरंस असेल किंवा PF असेल त्याचबरोबर पक्क्या स्वरूपाचे ओळखपत्रही कंपनी प्रशासनाने किंवा रूग्णालय प्रशासनाने दिलेले नाहीत.या संदर्भात रूग्णालय अधिष्ठाता व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असता त्यांनीही याची काहीच दखल घेतलेली नाही. तेव्हा लवकरात लवकर आमच्या पगारी व्हाव्यात, Provident Fund ची व्यवस्था व्हावी तसेच आमच्यासाठी सुरक्षेचे प्रावधान करावेत व कामाच्या ठिकाणी पगारीबद्दल विचारणा केली असता सुपरवायजर कामगारांना कामावरून काढुन टाकण्याची धमकी देतात.किमान तशी भीती दाखवतात . यालाही चाप बसावा. कोविड युद्धा म्हणुन गौरवु नका मात्र आम्हांला आमच्या हक्काच्या पगारी द्या. अशी प्रतिक्रिया सदर कर्मचार्यानी महाराष्ट्र जीवनशी बोलताना दिली.