लातूर शहर डीवायएसपी सचिन सांगळे यांना तात्काळ निलंबित करा - : जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी

लातूर शहर डीवायएसपी


सचिन सांगळे यांना तात्काळ निलंबित करा - : जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी



 लातूर - प्रतिनिधी


4 Aug 2020


(विक्रांत शंके) 


दि. 1 ऑगस्ट रोजी लातूर शहरातील पत्रकाराचा अपमान करणार्या " त्या " पोलिस आधिकार्याचे तात्काळ निलंबन व्हावे म्हणुन जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना व पत्रकारानी खडा पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभुमीवर पत्रकारांच्या वतीने डीवायएसपी सांगळे यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे. अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, 


लातूर शहर डीवायएसपी सचिन सांगळे यांनी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दैनिक प्रभातचे संपादक रघुनाथ बनसोडे यांना अण्णाभाऊ साठे चौकात पोलीस कर्मचारी व समाजबांधवांच्या समोर एकेरी शब्दात अरेरावीची भाषा केली व तू कोण? इथे का आलास, पत्रकार असला तरी इथे थांबायचे नाही. बस गाडीत,गाडीत बसवा याला , असे म्हणून सर्वांसमोर अपमान करून पोलिसांच्या गाडीत डांबून बसवले व शहरात एका आरोपी सारखे फिरवले. हा पत्रकारांचा जाणून बुजून केलेला अपमान आहे असे आम्हां सर्व पत्रकार बांधवाचे ठाम मत आहे. 


  महामानव अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असताना बातमी करण्यासाठी त्या ठिकाणी पत्रकार बनसोडे उपस्थित होते. पत्रकारांना संचारबंदीतुन वगळण्यात आलेलं आहे किंबहुना पत्रकारांना कुणीही त्यांच्या कर्तव्यापासुन रोखु शकत नाही. मात्र सांगळे यांनी हा नतद्रष्टपणा केला आहे. 


     शहर डीवायएसपी सचिन सांगळे यांनी यापूर्वी लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे व दूरदर्शन टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर यांना व अशा अनेक पत्रकारांना अर्वाच्च भाषेत वागणूक बोलत निम्न दर्जाची वागणुक दिलेली आहे.. एवढ्यावर न थांबता सांगळे यांची या प्रतिष्ठिताना काठीने मारण्यापर्यंतही मजल गेलेली आहे. त्यामुळे पोलिसी दादागिरीचा नमुना असणार्या सांगळे यांना तात्काळ निलंबित करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना न्याय द्यावा. अन्यथा जिल्ह्यातील पत्रकारांना नाईलाजाने कोविड संकटात शांततेच्या मार्गानी आंदोलन करावे लागेल. अशा आशयाचे व मागणीचे निवेदन पत्रकार बांधवातर्फे मुख्यमंत्री,गृहमंत्री, विरोधी पक्षनेते,पालकमंत्री,लातूर, पोलीस महासंचालक मुंबई, जिल्हाधिकारी लातूर,जिल्हा पोलिस अधीक्षक लातूर याना देण्यात आले आहे. सदर निवेदनावर पत्रकार रघुनाथ बनसोडे,अशोक देडे, नरसिंह घोणे, लिंबराज पन्हाळकर, बालाजी वागलगावे, दीपकरत्न निलंगेकर,अशोक हनवते,ज्ञानेश्वर सागावे, संगम कोटलवार,विष्णू अष्टेकर,दिगंबर तारे, महादेव डोंबे आदी पत्रकारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.